बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर आहे केंद्रीय मंत्र्याची लेक, आता चित्रपटात दिसणार मुख्य भुमिकेत!

अभिनेत्री आणि मॉडेल होण्यापूर्वी आरूषि निशंक कथ्थक डान्सर आहे. याशिवाय आरूषी निशंक महिला सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात कार्यरत असते.

  ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिमश्री फिल्म आणि टी सिरीजने मिळून त्यांचा तारिणी हा नवा प्रोजेक्ट जाहीर केला आहे. तारिणी हा नौदलाच्या सहा धडाकेबाज महिला अधिकाऱ्यांवर आधारित चित्रपट आहे. १९ सप्टेंबर २०१७ ला वर्तिका जोशी,प्रतिभा जामवाल,पी.स्वाती,एस.विजया,ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या सहा जणांनी गोव्यातून भारतीय नौदलाच्या सेलिंग बोट आयएनएस तारिणीवरून जगभ्रमंतीचा प्रवास सुरू केला आणि १९ मे २०१८ ला त्या परत आल्या. त्यांनी २१,६०० नॉटकिल माईल अंतर प्रवास केला. २१ मे २०१८ला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोलंड आणि दक्षिण आफ्रिका मार्गे त्या गोव्याला पोहोचल्या.

   

  पंतप्रधानांनीही त्यांच्या या मोहिमेचे खूप कौतुक केले होते. या सहा महिला नेव्ही अधिकाऱ्यांवर आधारित ‘तारिणी’ चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. ‘हिमश्री’ आणि ‘टी-सीरीज’ अंतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाची घोषणा ८ मार्च २०२१ ला घोषणा करण्यात आली आहे.

  या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडला आणखी एक नवीन सुंदर चेहरा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषि निशंक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Arushi Nishank (@arushi.nishank)

  कोण आहे आरूषी निशंक

  अभिनेत्री आणि मॉडेल होण्यापूर्वी आरूषि निशंक कथ्थक डान्सर आहे. याशिवाय आरूषी निशंक महिला सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात कार्यरत असते. याव्यतिरिक्त ती ‘वर्षा गंगा अभियाना’ची राष्ट्रीय संयोजक देखील आहेत. आरुषी निशंकने या कोरोन काळात खादी व कापसाचा हा मास्क सैन्य कर्मचारी, पोलिस आणि कोविड-वॉरियर्सना विनामूल्य वाटप केला. आरुषि निशंक स्वतः ‘हिमश्री’ बॅनरची निर्माती आणि मालक देखील आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Arushi Nishank (@arushi.nishank)