दिवंगत चिरंजीवी सर्जाच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ५ महिन्याच्या मुलाच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित

चिरंजीवी या सिनेमावर काम करत होते. सिनेमाचं काम सुरू असताना देशात करोनामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आलं. ज्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. चिरंजीवीने बहुतांश चित्रीकरण पूर्ण केलं होतं. असं असलं तरी काही सीनचं चित्रीकरण राहिलं होतं.

  दिवंगत कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा यांचा अखेरचा राजमार्टंध चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे सिनेमाचा ट्रेलर चिरंजीवीच्या पत्नीने मेघना राज सर्जाने आपल्या पाच महिन्याच्या मुलासोबत प्रदर्शित केला. स्वतः मेघनाने एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती चाहत्यांना दिली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj)

  या व्हिडिओमध्ये ज्युनिअर चिरू आपल्या आईच्या मांडीत बसून वडिलांच्या शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांचे डोळे पाणावले.

  चिरंजीवी या सिनेमावर काम करत होते. सिनेमाचं काम सुरू असताना देशात करोनामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आलं. ज्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. चिरंजीवीने बहुतांश चित्रीकरण पूर्ण केलं होतं. असं असलं तरी काही सीनचं चित्रीकरण राहिलं होतं. त्याच्या निधनानंतर चिरंजीवीच्या भावाने ध्रुव सर्जाने उर्वरित भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं. आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj)

  गेल्या वर्षी करोना काळात चिरंजीवी सर्जाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कन्नड सिनेसृष्टी हादरून गेली होती. चिरंजीवी सर्जाचं २ जून २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी चिरंजीवीने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूवेळी पत्नी मेघना राज सर्जा तीन महिन्यांची गरोदर होती.