meghraj raje bhosale

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या वादावर आता पडदा पडला आहे. कारण पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळाने मेघराज राजेभोसले(meghraj raje bhosale) यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत त्यांची निवड केली आहे.

कोल्हापूर येथे २६ नोव्हेंबरला झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. तेरा संचालकांपैकी आठ संचालकांनी राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अविश्वास व्यक्त केला होता. त्यावेळी प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडले जातील, असे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी सांगितले होते.

काल  मुंबईत संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सुशांत शेलार व निकिता मोघे यांनी मेघराज राजेभोसले यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर झाला आणि राजेभोसले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.