मेलबर्न फिल्म फेस्टीवल आता ऑक्टोबरमध्ये होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेलबर्न फिल्म फेस्टीवलची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये मेलबर्न फिल्म फेस्टीवल (आयएफएफएम)  होणार आहे.  आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान फिल्म फेस्टीवल होणार आहे.

आयोजकांनी असे सांगितले आहे की, फेस्टीवलमध्ये होणारा पुरस्कार सोहळा हा पुढच्या वर्षी २०२१ मध्ये होणार आहे. एक फिल्म क्लब सुरु करण्यासाठीही आयोजकांचे प्रयत्न सुरु आहेत.