सोशल मीडियावर अक्टीव्ह असणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांना अनेकवेळा ट्रोलींगचा सामना करावा लागतो. अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी नेहमी कविता, फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. मात्र आता कवितेमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
- ment/bollywood/actor, amitabh-bachchan,rouble-
सोशल मीडियावर अक्टीव्ह असणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांना अनेकवेळा ट्रोलींगचा सामना करावा लागतो. अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी नेहमी कविता, फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. मात्र आता कवितेमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
T 3761 – थोड़ा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध ख़ुशियों का
*थोड़ी पत्तियां ख़यालों की..*थोड़े गम को कूटकर बारीक,
हँसी की चीनी मिला दीजिये..
*उबलने दीजिये ख़्वाबों को*
*कुछ देर तक..!*यह ज़िंदगी की चाय है जनाब..
इसे तसल्ली के कप में छानकर
*घूंट घूंट कर मज़ा लीजिये…!!*☕🍵 pic.twitter.com/qwGbczzcLp— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 23, 2020
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे. याबद्दल अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरही टिशाने कॅमेंट केली आहे- “सर, तुमच्या वॉलवर माझी कविता येणे हे माझे भाग्यच आहे, परंतू तुम्ही या कवितेला माझे नाव दिले असते तर मला खूप आनंद झाला असता, मला आशा आहे की, तुम्ही यावर उत्तर नक्की द्याल.
यानंतर एका ट्रोलर्सने अमिताभ बच्चन यांना आठवण करून दिले की, जेव्हा कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितांमध्ये हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी वापरल्या तेव्हा तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होते. आणि तुम्हीच जर टिशाचे श्रेय तिला देत नाहीत हे काय आहे?