कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या आवाजात ‘मी…कालिदास’

घाटे लिखित 'वारस' हि कथा विज्ञानाकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात.

    हळूहळू वाचनसंस्कृतीची जागा श्रवणसंस्कृती घेऊ लागल्याचं चित्र जगभर पहायला मिळत आहे. बदलाचे हेच संकेत ओळखत ‘स्टोरीटेल मराठी’च्या माध्यमातून सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या आवाजात मराठीतील साहित्यसंपदा श्रोत्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. यात विविध साहित्यप्रकारांतील वेगवेगळ्या दर्जेदार तसेच गाजलेल्या लोकप्रिय कथा, कादंबऱ्यांसोबतच खास नव्या ओरिजनल ऑडिओबुक मालिकांची निर्मिती ऑडिओबुकच्या माध्यमातून साहित्यरसिकांसाठी करण्यात येत आहे.

    आता प्रख्यात जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या ‘वारस’ या कादंबरीचं रूपांतर ‘स्टोरीटेल मराठी’च्या नव्या ऑडिओबुकमध्ये करण्यात आलं असून, विज्ञानप्रेमी साहित्यरसिकांना अत्यंत वेगळा अनुभव घेता येणार आहे. या कादंबरीचं वाचन अभिनेते-दिग्दर्शक गणेश माने यांनी केलं आहे. घाटे लिखित ‘वारस’ हि कथा विज्ञानाकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात.

    या कथेतील नचिकेतला एक मोहीम सोपवली जाते आणि ती फत्ते करण्यासाठी पृथ्वीवर जावं लागतं, पण हे सगळं करत असताना त्याला त्याच्याच अस्तित्वाचा शोध लागतो का? खरा वारस नेमका कोण असतो? या अशा अनेक प्रसंगाचा थरारक अनुभव दर्शवणारी कादंबरी गणेश यांच्या आवाजात साहित्यरसिकांना ऐकता येईल.