santosh juvekar

या चित्रपटात संतोष जुवेकर, प्रीतम कागणे, हेमांगी कवी, प्रणव रावराणे, अतुला दुग्गल, कश्यप परुळेकर, आसावरी जोशी, उषा नाडकर्णी, यतिन कार्येकर अशी मराठीतील भलीमोठी स्टारकास्ट आहे.

    प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेल्या ‘३५% काठावर पास’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक सतीश मोतलिंगचा

    हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘स्ट्रीम्स ७’ या डिजिटल वाहिनीवरील डिजिटल थिएटरमध्ये ‘मिले जब छोरा छोरी’चा प्रीमियर सादर केला जाणार आहे.

     ‘३५% काठावर पास’ला मिळालेल्या यशानंतर ‘स्ट्रीम्स ७’वरच आपला पुढील चित्रपटही प्रदर्शित करण्याचा निर्णय सतीशनं घेतला आहे. ‘मिले जब छोरा छोरी’ हा चित्रपट पूर्णत: विदेशात शूट करण्यात आला. या चित्रपटाचं ४२ दिवसांचं शूटिंग बँकॅाक, पटाया आणि फुकेटमध्ये करण्यात आलं आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, प्रीतम कागणे, हेमांगी कवी, प्रणव रावराणे, अतुला दुग्गल, कश्यप परुळेकर, आसावरी जोशी, उषा नाडकर्णी, यतिन कार्येकर अशी मराठीतील भलीमोठी स्टारकास्ट आहे.

    या चित्रपटाच्या निमित्तानं संतोष आणि प्रीतम यांनी प्रथमच एकत्र अभिनय केला आहे. सतीश मोतलिंग फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात प्रेमकथेसोबतच विभिन्न देशांतील संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या तीन मित्रांची कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.