मिलिंद सोमणच्या वेबसिरीजचा ट्रेलर येताच चाहत्यांची उडाली झोप, प्रदर्शनाआधीच ‘पौरषपुर’ चर्चेत!

अभिनेता मिलिंद सोमणची पौरषपुर ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुलकाच प्रदर्शित झालाय. यामध्ये मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, पौलमी दास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून बोल्ड दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो. प्रदर्शनापूर्वीच ही वेब सीरिज त्यातील बोल्ड दृश्यांमुळे जोरदार चर्चेत आहे.

काय आहे पौरषपुर

पुरुषांची मक्तेदारी, केवळ शारीरिक सुख देणारी वस्तू म्हणून स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन. पाहण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन, स्त्रियांना मिळणारी तुच्छ वागणूक हा या सीरिजच्या कथेचा गाभा आहे. पुरुषप्रधान राज्यात एक स्त्री सत्तेची खुर्ची मिळवण्यात यशस्वी होते का, हे या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. या वेब सीरिजसाठी बराच खर्च करण्यात आला असून त्याचा सेट, कलाकारांचा पोशाख विशेष लक्ष वेधून घेतात.

View this post on Instagram

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

ही सीरिज येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे सात ते आठ भाग असतील. या सीरिजच्या माध्यमातून शिल्पा शिंदे ओटीटी विश्वात पदार्पण करतेय. तर छोट्या पडद्यावरील शाहीर शेख याचीही सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे.