मिलिंद- अंकिताचं फॅमिली प्लॅनिंग झालं, चाहत्यांच्या प्रश्नाला दिलं ‘हे’ उत्तर!

अंकिता आणि मिलिंदने २२ एप्रिल २०१८ रोजी अलिबागमध्ये लग्न केले. त्यानंतर २०१९मध्ये अंकिता आणि मिलिंदने स्पेनमध्ये देखील लग्न केले.

  प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोणवार हे कायम चर्चेत असतात. ते सतत सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो आणि वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात.  त्यांच्या रोमॅण्टीक फोटोंची चर्चा नेहमी सोशल मीडियावर रंगते. नुकताच अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा अंकिताने दिलेलं उत्तर चर्चेत आले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  अंकिताने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने तिला ‘तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर अंकिताने दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘आम्ही एक प्लॅन फॉमिली आहोत’ असे मजेशील अंदाजात म्हटले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  अंकिता आणि मिलिंदने २२ एप्रिल २०१८ रोजी अलिबागमध्ये लग्न केले. त्यानंतर २०१९मध्ये अंकिता आणि मिलिंदने स्पेनमध्ये देखील लग्न केले. अंकिता आणि मिलिंदमध्ये २६ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)