मिनी टीव्हीवर आता येणार टॉप विनोदवीर

आपल्या अनोख्या अंदाजात आशीष चंचलानी तुम्हाला 'ब्‍यूटी एंड फॅशन इन्फ्लूएन्सर'च्या अद्भुत दुनियेत घेऊन जाईल आणि अमित भड़ाना अतिउत्‍साही बॉस आणि पूर्वप्रेमिकेच्यामध्ये अडकलेल्या सेल्‍समॅनच्या भूमिकेत असेल.

    अमेझॉनची फ्री व्हिडीओ एंटरटेनमेन्‍ट सर्विस ‘मिनीटीव्ही’नं कॉमिक कंटेंटसाठी एक्‍सक्‍लूसीव्ह लाइनअपची घोषणा केली आहे. हा कंटेंट खास करून मिनीटीव्हीच्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आला असून, भारताचे लोकप्रिय विनोदवीर आशीष चंचलानी, प्राजक्‍ता कोळी, अमित भड़ाना, डॉली सिंह, सलोनी गौर आणि बी यूनिक आपल्या विनोदी ठसक्याच्या भरपूर व्हिडीओंसोबत दर्शकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

    भारतातील लोकप्रिय विनोदीवीरांची ही भागीदारी दैनंदिन आयुष्यातील अनोखे स्कीट्स तयार करून सर्वप्रथम मिनीटीव्हीवर प्रदर्शित करण्यात येईल. डॉली सिंहचे ह्यूमरस स्‍केच तुम्हाला ब्रेकअप मधून सावरण्याचे सात स्‍टेजेस सांगेल तर, प्राजक्‍ता कोळी ‘मिडिल क्‍लास हॅक्‍स’च्या कलेत कसं परफेक्‍ट होता येईल, हे सांगेल. आपल्या अनोख्या अंदाजात आशीष चंचलानी तुम्हाला ‘ब्‍यूटी एंड फॅशन इन्फ्लूएन्सर’च्या अद्भुत दुनियेत घेऊन जाईल आणि अमित भड़ाना अतिउत्‍साही बॉस आणि पूर्वप्रेमिकेच्यामध्ये अडकलेल्या सेल्‍समॅनच्या भूमिकेत असेल. बी यूनिक आपल्या मित्रांसोबत मजेदार तथा वास्‍तविक वाटणारे ब्रेकअपमधून बाहेर येण्याचे किस्‍से शेयर करेल.