शाहिद कपूरवर बायको झाली नाराज, सोशल मीडियावर मागितली शाहिदने मदत!

कबीर सिंगनंतर शाहिद आणखी एका तेलगू रिमेकमध्ये दिसणार आहे. ‘जर्सी’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या तयारीला त्याने सुरुवात केली. यामध्ये शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे.

अनेक चांगल्या अभिनेत्यांमध्ये अभिनेता शाहीद कपूरची गणना होते. ‘कबीर सिंग’ या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरचा दमदार अभिनय चाहत्यांना पाहायला मिळाला. करिअरमध्ये सगळं काही चांगलं सुरू असतानाही शाहिदने अचानक सोशल मीडियावर पोस्ट लिहित कामाची मागणी केली. इतकंच नव्हे तर यासाठी त्याने पत्नी मीरा राजपूतला जबाबदार ठरवलं.

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

मीरा शाहीदवर नाखूष

शाहीदचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट असले तरी त्याची पत्नी मीरा मात्र नाखूश आहेम्हणूनच शाहिदने पोस्ट लिहित वेगळ्या धाटणीच्या भूमिकांची मागणी केली आहे. शाहिदने आपल्या पोस्टमध्ये म्हटलय, “ज्या चित्रपटात मला धमाल मस्ती आणि डान्स करायला मिळेल असा चित्रपट मी काम करत नाही,  असा सवाल माझ्या पत्नीने मला विचारला आहे. तर अशा प्रकारचा चित्रपट असेल तर कृपया मला संधी द्या, जेणेकरून मी माझ्या पत्नीला खूश करू शकेन”

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

अनेक चित्रपट पाईपलाईनमध्ये