
मिर्झापूर’मधील रॉबिन अर्थात अभिनेता प्रियांशू पेनयुली(priyanshu painyuli marriage)) हा लवकरच लग्न करणार आहे.
ॲमेझॉन प्राइमवरील ‘मिर्झापूर’(mirzapur) या वेबसीरिजचा दुसरा भाग काही दिवसांपूर्वी प्रदर्शित आला. ‘मिर्झापूर’च्या पहिल्या भागाप्रमाणे ‘मिर्झापूर २’ या वेबसीरिजलादेखील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. मिर्झापूरवरील चर्चेनंतर आता चर्चा रंगली आहे ती या सीरिजमधील अभिनेत्याच्या लग्नाची. या वेबसीरिजमध्ये महत्वाची भूमिका निभावणारा अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
View this post on Instagram
‘मिर्झापूर’मधील रॉबिन अर्थात अभिनेता प्रियांशू पेनयुली(priyanshu painyuli marriage)) हा लवकरच लग्न करणार आहे. तो आपली प्रेयसी वंदना जोशी हिच्यासोबत लग्न करणार आहे. तसेच कोरोनाचा काळ असल्यामुळे कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.