मिर्झापूरमधील हा अभिनेता आर्थिक परिस्थितीमुळे होता १५ दिवस उपाशी, कामं मिळवण्यासाठी करावा लागला होता संघर्ष!

लिलिपुट यांच आज लेखक तसेच अभिनेता म्हणून नाव आहे. पण त्यासाठी त्यांना कठीण संघर्ष करावा लागला होता. ते बिहारच्या गया या ठिकाणाहून १९७५ मध्ये मुंबईत आले होते. तर एकदा त्यांना १५ दिवस उपाशी लहावं लागलं होत.

    मिर्झापूर वेबसिरीजमधून प्रकाश झोतात आलेला लिलिपुट म्हणजेच मालिकेतील दद्धा त्यागी यांचा संघर्ष कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नव्हता. लिलिपुट यांच आज लेखक तसेच अभिनेता म्हणून नाव आहे. पण त्यासाठी त्यांना कठीण संघर्ष करावा लागला होता. ते बिहारच्या गया या ठिकाणाहून १९७५ मध्ये मुंबईत आले होते. तर एकदा त्यांना १५ दिवस उपाशी लहावं लागलं होत.

    याबद्दल बोलताना लिलिपुट म्हणाले, ‘माझ्याविषयी अफवा उठली होती की गरीबीमुळे मी मुलिच्या घरी राहत आहे. पण तस काही नाही मी माझं घर तिला दिलं आहे. लेखन आणि अभिनयातून फार नाही पण घर चालेल इतके पैसे नक्कीच मिळतात. काही दिवसांपूर्वीच मी एक साउथ चित्रपट केला आहे तसेच मिर्झापूर ३ ची देखिल तयारी सुरू आहे. त्यामुळे घर चालेल इतके पैसे तर आहेत. आणि त्यापेक्षा जास्त नको देखिल आहेत. मी माझ्या पत्नीसोबत इथे राहतो.’

    आपल्या संघर्षाविषयी बोलताना लिलिपुट म्हणाले, बिहारच्या गयामधून १९७५ ला केवळ १३० रुपये घेऊन मुंबईत आलो होतो. त्यानंतर १९८२ पर्यंत हा प्रवास फार कठीण होता. त्या काळात काम मिळत नसल्याने तब्बल १५ दिवस खाण्यासाठी काहीच अन्न घरात नसल्याचं ते म्हणाले. त्यानंतर एका मित्राने घरी जेवायला बोलवलं तेव्हा ते बेशुद्ध पडले होते.

    मुंबईच्या खार इथे ते अनेक मुलांसोबत एकत्र रहायचे. काम मिळत नसल्याने त्यांनी रंग देणे, लाकडं कापणे अशी सर्वप्रकारची कामंही केली होती. लिलिपुट यांनी अनेक चित्रपटांत आजवर काम केलं आहे.