‘मिर्झापूर’मधील अभिनेता रस्त्यावर विकतोय ‘रामलड्डू’, फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया!

सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमधून लॉकडाऊन दरम्यान कलाकारांचे कशा प्रकारे हाल होत आहेत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

    ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये गुड्डूभैया म्हणजे अभिनेता अली फझलच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते राजेश तैलंग यांचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल  होत आहे. या फोटोत ते चक्क रामलड्डू विकताना दिसत आहेत. ‘‘लॉकडाऊन संपेल, कोरोना जाईल आणि तेव्हा पुन्हा कामाला नव्याने सुरुवात करू,’’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे.

     

    मिर्झापूर या वेबसिरीजचे आतापर्यंत दोन भाग आले आहेत. दोन्ही भागांमध्ये राजेश तैलंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यांच्या कामाचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमधून लॉकडाऊन दरम्यान कलाकारांचे कशा प्रकारे हाल होत आहेत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

    आतापर्यंत अनेक कलाकारांना लॉकडाऊन दरम्यान आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांनी सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली होती. दरम्यान, राजेश यांचा फोटो पाहून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटत आहे तर काहींना राजेश यांच्यावर आर्थिक संकट आल्याचे म्हटलं आहे.