भारतात परतली ‘मिस यूनिवर्सची 3rd रनरअप’ एडलिन कॅस्टिलिनो, पण सोशल मीडियावर रंगली तिच्या महागड्या ड्रेसची चर्चा!

स्पर्धेच्या शेवटच्या भागात एडलीनला लॉकडाऊनवर प्रश्न विचारण्यात आला होता. तिला विचारण्यात आलं होतं, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतं आहे. अशावेळी लॉकडाऊनचं योग्य पर्याय आहे, की लॉकडाऊन उघडून कोरोनाचा प्रसार वाढायला द्यावा.

  ‘मिस युनिवर्स २०२१’चा किताब भारताला मिळाला नाही. मात्र ६९ व्या मिस युनिवर्समध्ये भारताला खुपचं नाव मिळालं. टॉप ५ मध्ये भारताचा समावेश झाला. एडलीन कॅस्टिलिनो तिसरी रनर अप ठरली आहे. एडलीनाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. एडलीन नुकतीच फ्लोरिडातून भारतात परतली आहे.  यावेळी एडलीनच्या हातात भारताचा तिरंगा होता.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Miss Diva (@missdivaorg)

  एडलीन ही मुळची कुवैतची आहे. तिचे आई- वडील कर्नाटकचे आहेत. एडलीनने मिस युनिवर्समध्ये भाग घेण्याआधी, मिस दीवा युनिवर्स २०२० हा किताब पटकावला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Miss Diva (@missdivaorg)

  तिच्या उत्तराने सगळ्यांनाच वाटले आश्चर्य

  स्पर्धेच्या शेवटच्या भागात एडलीनला लॉकडाऊनवर प्रश्न विचारण्यात आला होता. तिला विचारण्यात आलं होतं, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतं आहे. अशावेळी लॉकडाऊनचं योग्य पर्याय आहे, की लॉकडाऊन उघडून कोरोनाचा प्रसार वाढायला द्यावा.

  यावर तिनं म्हटलं, की आपल्या लोकांच्या आरोग्यापुढे काहीच महत्वाचं नाही. त्यामुळे शासनाचा लॉकडाऊनचा निर्णय योग्य आहे आणि अर्थव्यवस्थेसाठी नागरिकांनी आणि शासनाने सामंजस्याने काहीतरी पर्याय शोधायला हवा.

  महागड्या ड्रेसची होतेय चर्चा

  कॅस्टेलिनोचा पोशाख हाउस ऑफ थ्री या कपड्यांच्या ब्रँडचा आहे. ‘झोहरा’ म्हणून ओळखले जाणारे, फुलांचे ब्लेझर हाताने विणलेल्या बनारसी रेशीमचे बनलेले आहे. या ड्रेसला काश्मिरी वर्क करण्यात आले आहे आणि मण्यांचा वापर केला गेलाय. या ड्रेसची एकूण किंमत तुम्हाला माहितेय का? या जॅकेटची किंमत २९ हजार आहे तर पँण्ट २० हजारांची आहे. एकूणच ड्रेस ४९ हजारांचा आहे.