या कारणामुळे मिथिला पालकर सोडावं लागलं दादरमधील आजी आजोबांच घर, सत्य आलं समोर!

मिथिला पुढे म्हणाली की, मी आजी आजोबांपासून वॉकिंग डिस्टन्सवर एका अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांच्यासोबत राहण्यासाठी जोपर्यंत मला शंभर टक्के खात्री वाटत नाही, तोपर्यंत राहणार नाही. माझी टेस्ट निगेटिव्ह आली पण मी अत्यंत जागरूक आहे.

  ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते. मात्र आता असे समजते आहे की तिने दादरमधील आजी आजोबांचे घर सोडून दुसरीकडे रहायला गेली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

  मिथिला पालकर हैदराबादमध्ये शूटिंग करून मुंबईत परतली आहे. ती दादरमध्ये आपल्या आजी आजोबांसोबत राहते. मात्र आता ती वेगळ्या आपर्टमेंटमध्ये राहते आहे. तिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी आजोबांच्या काळजी पोटी हा निर्णय घेतला आहे. याबाबत मिथिला पालकर म्हणाली की, ऑक्टोबर २०२० पासून मी काम करायला सुरूवात केली. मी घराच्या बाहेर जाताना खूप काळजी घेते. कामासाठी बाहेर पडायचे आहे तर आजी आजोबांसोबत न राहण्याचे ठरविले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

  मिथिला पुढे म्हणाली की, मी आजी आजोबांपासून वॉकिंग डिस्टन्सवर एका अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांच्यासोबत राहण्यासाठी जोपर्यंत मला शंभर टक्के खात्री वाटत नाही, तोपर्यंत राहणार नाही. माझी टेस्ट निगेटिव्ह आली पण मी अत्यंत जागरूक आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

  मिथिलाच्या ९३ वर्षीय आजोबांची ऑगस्ट,२०२० ला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि दहा दिवस होम आइसोलेशनमध्ये ते बरे झाले होते. ती म्हणाली की, माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. जर मी त्यांना भेटायला गेले तरी मी मास्क घालून भेटते. तिथे मी विनाकारण जात नाही.