मिथुन-गोविंदाची छोट्या पडद्यावर  एन्ट्री, ‘या’ मालिकेत दिसणार खास भूमिकेत!

या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे. यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डान्सिंग सुपरस्टारचा विचार करण्यात येत आहे.

    ‘चीकू की मम्मी दूर की’ या स्टार प्लस वाहिनीवर येणाऱ्या आगामी शोचे प्रोमोज सध्या लक्ष वेधून घेत आहेत. आई-मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी या मालिकेत पहायला मिळणार असल्याचं प्रोमोवरून समजतं. परिधी शर्मा आणि वैष्णवी प्रजापती यांच्या या शोमध्ये मुख्य भूमिका आहेत. ‘चीकू की मम्मी दूर की’ या शोच्या आगामी प्रोमोमध्ये डिस्को डान्सर मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    मिथुन आणि गोविंदा यांना बॉलीवुडमधील डान्सिंग लेजेंड मानले जातात. या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे. यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डान्सिंग सुपरस्टारचा विचार करण्यात येत आहे. मिथुन आणि गोविंदा हे दोघेही आपल्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. निर्मात्यांनी या दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे ते अद्याप समजलेलं नाही. लवकरच याबाबतची माहितीही समोर येईल.