मिथुनपुत्रावर बलात्काराचा आरोप, पत्नी योगिताविरोधातही केली तक्रार

अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीवर (Akshay Chakraborty)  बलात्कार (Rape case) आणि जबरीने गर्भपात केल्याचा आरोप आहे. एका ३८ वर्षाच्या महिलेने मिथुन चक्रवर्तींच्या मुलाविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) गुरुवारी रात्री एफआयआर (FIR) दाखल केला होता. या एफआयआरमध्ये मिथून चक्रवर्तींची पत्नी योगिता बाली (Ypgita Bali) यांचेही नाव आहे.

मुंबई : अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीवर (Akshay Chakraborty)  बलात्कार (Rape case) आणि जबरीने गर्भपात केल्याचा आरोप आहे. एका ३८ वर्षाच्या महिलेने मिथुन चक्रवर्तींच्या मुलाविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) गुरुवारी रात्री एफआयआर (FIR) दाखल केला होता. या एफआयआरमध्ये मिथून चक्रवर्तींची पत्नी योगिता बाली (Ypgita Bali) यांचेही नाव आहे. त्यांच्यावर पीडितेला धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. योगीता बालीवर धमकावण्याचा आरोप तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ पासून पीडित तरुणी आणि महाक्षय रिलेशनशीपमध्ये होते. याच दरम्यान महाअक्षयने पीडितेला त्याच्या घरी बोलावले व तिला शितपेयातून नशेच्या गोळ्या दिल्या. तसंच तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याने तिला लग्नाचे आमिषदेखील दाखविले.

या काळात त्याने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली. मात्र, त्यानंतर महाअक्षयच्या आईकडून पीडितेला गर्भपात करण्याची धमकी मिळाल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. पीडित तरुणीने गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मेमोने पीडितेला काही गोळ्या खायला दिल्या. ज्यामुळे तिचा गर्भपात झाला, असा आरोपही तिने केला आहे. दिल्ली कोर्टाने दिले आदेश याप्रकरणी पीडिता तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली होती.

मात्र, तिची तक्रार नोंदवून घेतली नाही असेही तिने तक्रारीत नमूद केले. त्यानंतर महाअक्षय आणि योगिता बाली यांनी पीडितेला धमकवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पीडित तरुणी याच दरम्यान दिल्लीला गेली असताना तिने रोहिणी कोर्टात या प्रकरणी न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केली. या प्रकरणी कोर्टाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येणार आहे.