मिथुन चक्रवर्ती यांच्या आधीच्या दोन्ही पत्नी होत्या अभिनेत्री, ४ महिन्यात घेतला घटस्फोट, आता या दोघी करताता हे काम!

हेलेना २१ वर्षांची होती आणि मिथुन बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते. मिथुन व हेलेना यांनी लग्न केले. पण हे लग्न केवळ चार महिने टिकले.

  अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस. मिथून चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण नेहमीच चित्रपटांपेक्षा त्याची रिअल लाईफ जास्त चर्चेत राहिली. श्रीदेवी आणि मिथुन यांच्या लव्ह लाईफचे किस्से सगळ्यांनाच ठाऊक आहेत.

  मिथुन- लग्न आणि किस्से

  मिथुन यांनी श्रीदेवींशी गुपचूप लग्न केले होते, असे म्हटले जाते. पण त्या दोघांनी कधीच ही गोष्ट मान्य केली नाही. १९७९ मध्ये मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. आजही दोघे सोबत आहेत. पण योगिता बाली यांच्याआधी मिथुन यांची पहिली पत्नीही होती हेलेना ल्यूक. मिथून यांची पहिली पत्नी हेलेना ही सुद्धा अभिनेत्री होती. ‘जुदाई’ ‘साथ साथ’ आणि ‘एक नया रिश्ता’ चित्रपटातही ती झळकली. पण त्यानंतर तिला अपयश मिळाले आणि ती बॉलिवूडमधून अचानक गायब झाली.

  हेलेनाने एका मुलाखतीत सांगितली स्टोरी

  मिथुन सकाळी सहा वाजतापासून तर रात्री झोपेपर्यंत मला लग्नासाठी विचारत. ते रोज मला भेटत. अखेर त्यांनी मला स्वत:च्या प्रेमात पडायला भाग पाडले आणि १९७९ मध्ये आम्ही कुणाला कळू न देता लग्न केले. त्यावेळी हेलेना २१ वर्षांची होती आणि मिथुन बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते. मिथुन व हेलेना यांनी लग्न केले. पण हे लग्न केवळ चार महिने टिकले.

  हेलेनाने एका मुलाखतीत याची कबुली दिली होती. ‘मिथुन यांच्या घरी त्यांचे दोन चुलत भाऊ आणि दोन कुत्री होती. लग्नानंतरही सगळे आमच्यासोबत होते. दोन्ही चुलत भाऊ मिथुनचा पैसा खर्च करत. मला ते अजिबात आवडायचे नाही. त्या दोन्ही चुलत भावांनी आमच्यापासून वेगळे राहावे, अशी माझी इच्छा होती. पण मिथुन यांना हे आवडले नाही. माझे दोन्ही भाऊ माझ्यासोबत राहतील. हवे तर तू या घरातून निघून जा, असे त्यांनी मला म्हटले. याचदरम्यान त्यांच्या व योगिता बालीच्या नात्याबद्दलही मला ऐकायला येत होते,’ असे हेलेनाने सांगितले होते.हेलेना आता न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली आहे आणि तिथे फ्लाईट अटेंडेंटचे काम करते असे म्हटले जाते.