मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला.., मनसेचा जान कुमार सानूला थेट इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) गायक जान कुमार सानूला (Jan Kumar Sanu) थेट इशारा देण्यात आला आहे. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये (Big Boss) केलं. यावरून महाराष्ट्र चित्रपट सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) गायक जान कुमार सानूला (Jan Kumar Sanu) थेट इशारा देण्यात आला आहे. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये (Big Boss) केलं. यावरून महाराष्ट्र चित्रपट सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे.

‘जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,’ अशा शब्दांत अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी,’ असा थेट इशारा खोपकर यांनी दिला आहे. ‘कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,’ असं खोपकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.