रिया चक्रवर्ती आणि कुटुंबियांचे मोबाईल फोन ईडीच्या ताब्यात

अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या वडिलांची आणि भावाची ईडीने चौकशी केली होती. मात्र या चौकशीनंतर आता रिया आणि तिच्या कुटुंबियांचे मोबाईल फोन ईडीच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या वडिलांची आणि भावाची ईडीने चौकशी केली होती. मात्र या चौकशीनंतर आता रिया आणि तिच्या कुटुंबियांचे मोबाईल फोन ईडीच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. रियावर मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचेदेखील दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. 

चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्यामुळे, अधिकाऱ्यांनी रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, मोबाईल आणि इंद्रजीत यांचा लॅपटॉप जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. तसंच रियाचं वार्षिक उत्पन्न आणि खर्च यांच्यात मोठा फरक असल्याचं इन्कम टॅक्स रिटर्नमधून स्पष्ट झालं आहे.