अभिनेत्रीने दिली गूड न्यूज, दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न!

एवलिनने तिच्या वाढदिवसा दिवशी बेबी बंपचा फोटो शेअर करत त्याला एक सुंदर कॅप्शन लिहीलं आहे. ‘तुला माझ्या हातात घ्यायची ओढ लागली आहे’, अशी कॅप्शन तिने शेअर केली आहे.

  बॉलिवूडमध्ये सहाय्यक भूमिकांमधून समोर आलेली अभिनेत्री एवलिन शर्माने तिच्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. एवलिन ही गरोदर असून लवकरच ती एका गोड बाळाला जन्म देणार आहे. एवलिनने सोशल मीडियावरून तिची ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

  एवलिन हिने दोन महिन्यांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड तुषान भिंडी याच्यासोबत लग्न केले होते. त्या दोघांनी १५ मे रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्नगाठ बांधली. एवलिनने तिच्या वाढदिवसा दिवशी बेबी बंपचा फोटो शेअर करत त्याला एक सुंदर कॅप्शन लिहीलं आहे. ‘तुला माझ्या हातात घ्यायची ओढ लागली आहे’, अशी कॅप्शन तिने शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

  एवलिन शर्मा व तुषान भिंडी हे २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. तुषान व एवलिनची भेट एका ब्लाईंड डेटवर झाली होती. त्यानंतर त्यांचा संपर्क वाढला व ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एवलिनने ये जवानी है दिवानी, यारियाँ, हिंदी मिडियम अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)