लॉकडाऊनमध्ये तयार झालेली मराठी वेबसीरिज ‘मंकी हाईस्ट’

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाला तेव्हा गोष्टी इतक्या बदलतील असं वाटलंसुद्धा नव्हतं. आपल्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना असतात पण त्या जेव्हा आकार घेऊ लागतात तेव्हा त्यांना अर्थ असतो. अनेक वर्ष मनात

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाला तेव्हा गोष्टी इतक्या बदलतील असं वाटलंसुद्धा नव्हतं. आपल्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना असतात पण त्या जेव्हा आकार घेऊ लागतात तेव्हा त्यांना अर्थ असतो. अनेक वर्ष मनात असलेल्या काही कथा घेऊन शूटचा अनेकांचा प्लॅन शेवटच्या टप्यात आला असताना कोरोनाचा कहर झाला. सर्व काही ठप्प झाले. लॉकडाऊन संपेल मग काम सुरु करूया असा विचार करता करताना लॉकडाऊन हनुमानाच्या शेपटासारखा वाढत गेला. या काळात डिजिटल मीडियावर वेगवेगळे मिम्स, लघुपट, कॉमेडी व्हिडिओज, गाण्यांचा सुळसुळाट झाला असताना आपण काही करायची गरज फार कोणाला वाटत नव्हती. पण डोक्याला गंज चढण्याआधीच आपल्या कल्पकतेचा आणि वेळेचा वापर करून लोकांना थोडं का होईना हसवू शकलो तर वेळ सार्थकी लागेल असा विचार काही जणांच्या डोक्यात आला. ते जोरात कामाला लागले आणि बघता बघता ‘मंकी हाईस्ट’ ही मराठी वेबसीरिज बनली. यात एकूण ७ एपिसोड आहेत. 

तुमच्याकडे शूट वेळी सर्व काही उपलब्ध असताना गोष्टी जितक्या सोप्या असतात तितक्या सोप्या यावेळी नव्हत्या. यातील कलाकार कधीच कोणी कोणाला भेटले नाही किंवा एकमेकांशी बोलले नाही तरीही ते तुम्हाला कुठेच जाणवणार नाही ते एकत्रच एकाच घरात वावरतायत असं तुम्हाला वाटेल. सारा श्रवण, अमृता माळवदकर, प्रियांका झेमसे, देव निखार्गे, अमोल जाधव हे कलाकार या वेबसीरिजमध्ये आहेत. आनंद ओक यांचे पार्श्वसंगीत असून देव निखार्गे, निलेश कुंजीर, इंद्रनील चव्हाण, विनोद गायकर यांनी या सीरिजचे लेखन केले आहे.  ही वेब सीरिज युट्युब, हंगामा प्ले, एमएक्स प्ले, वोडाफोन आणि एअरटेल अॅप वर सुद्धा तुम्ही पाहू शकता.