अवकाशात रंगणार चित्तथरारक सीन्स, कारण दीपिका- हृतिक चा ‘फायटर’ येतोय!

हृतिक, सिद्धार्थ आनंद यांच्या वॉर, बँग बँग सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  याआधी असा प्रयोग भारतीय चित्रपटांत झाला नसल्याची त्यांनीं यावेळी सांगीतलं.

    अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाविषयी विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे हा देशातील पहिला वहिला एरियल ऍक्शन चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षांचीही उत्कंठा वाढली आहे.

    Viacom 18 या चित्रपटाची निर्मिती करत असून गुरुवारी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. हा एक बिग बजेट चित्रपट असून प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हृतिक, सिद्धार्थ आनंद यांच्या वॉर, बँग बँग सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  याआधी असा प्रयोग भारतीय चित्रपटांत झाला नसल्याची त्यांनीं यावेळी सांगीतलं.

    स्टूडियोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अजित अंधारे म्हणाले की, “एरियल ऍक्शन चित्रपट एक वेगळचं प्रदर्शन असणार आहे. आजवर असा प्रयोग झाला नाही. Hollywood चित्रपट ‘टॉप गन’ चा प्रशंसक असल्याने मी मागील काही वर्षांपासून अशा चित्रपटाच्या शोधात होतो, ज्याचं मूळ भारतीय असेल ज्यावर एरियल ऍक्शन चित्रपट बनवता येईल. हाच ‘फायटर’ चित्रपट असेल.”