लहान मुलाची स्वप्न आणि इच्छा या भावनांवर आधारीत ‘कानवट’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित!

चित्रपटाची कथा एका लहान मुलाची स्वप्न आणि इच्छा ह्या भावनांवर बेतलेली आहे, त्या मुलाच्या जीवनात नियतीने काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे, ज्यामुळे तो एका अकल्पित वाटेवर जातो, ज्यामुळे त्याचे जीवनच बदलून जाते.  कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत. पण  हे केवळ तर्क आहेत. चित्रपटाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ट्रेलर रिलीज पर्यंत वाट बघावी लागेल.

बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिने निर्मात्या अपर्णा होशिंग आपल्या  ‘कानभट्ट’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अनोखा आणि रोमहर्षक अनुभव देण्यास तयार आहेत. अलीकडेच, अपर्णा होशिंग ह्यांनी आपल्या ‘कानभट’ ह्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण केले. एकूणच ह्या लूकमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. कानभट मधील मुख्य भूमिकेतील अभिनेता भव्य शिंदेने आपल्या लूकमुळे सर्वांना आश्चर्य चकित केलंय.

ह्या उत्सुकता वाढवणाऱ्या मोशन पोस्टरमध्ये अभिनेता भव्य शिंदे दिसतोय, जो मंदिरात उभा आहे  आणि समोर प्रवाही गंगा नदी आहे. त्याच्यासमोर अभिनेते ऋग्वेद  मुळे एका पुजाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत.

चित्रपटाची कथा एका लहान मुलाची स्वप्न आणि इच्छा ह्या भावनांवर बेतलेली आहे, त्या मुलाच्या जीवनात नियतीने काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे, ज्यामुळे तो एका अकल्पित वाटेवर जातो, ज्यामुळे त्याचे जीवनच बदलून जाते.  कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत. पण  हे केवळ तर्क आहेत. चित्रपटाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ट्रेलर रिलीज पर्यंत वाट बघावी लागेल.

दिग्दर्शक आणि निर्माता अपर्णा एस. होशिंग आपल्या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणाल्या,  “मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाच्या पोस्टरला लोकांकडून हा उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी असाच विषय शोधायचा होता, जेथे आधुनिक आणि पारंपारिक मूल्ये इतरांशी जोडली जातील. आणि अगदी तशीच कानभट्टची हि कथा स्वप्नाविषयी आणि वास्तवाविषयी भाष्य करते. ”

अपर्णा एस होशिंग दिग्दर्शित ‘कानभट्ट’ ची निर्मिती, आपल्या रॅश प्रॉडक्शन ह्या बॅनरखाली स्वतः अपर्णा होशिंग ह्यांनी केली आहे. हा चित्रपट आगामी 19 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीज होणार आहे. गेल्या दशकभरापासून बॉलीवूड मध्ये कार्यरत असणाऱ्या अपर्णा एस होशिंग ह्यांनी ‘जीना है तो ठोक डाल, ‘उटपटांग’  आणि ‘दशहरा'(नील नितीन मुकेश अभिनीत ) सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.