‘ही’ अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, लवकरच दुबईच्या व्यवसायिका बरोबर थाटणार संसार!

एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मौनीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक मालिकांमधून झळकली.

  अभिनेत्री मौनी रॉय लवकरत लग्नबंधनात अडकरणार आहे. मौनी लवकरत बॉयफ्रेण्ड सूरज नंबियार याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी मौनीचं कुटुंब आणि सूरजच्या कुटुंबामध्ये लग्नाची बोलणी  झाली. मंदिरा ही मौनीची जवळची मैत्रिण आहे. यावेळी दोघांच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by mon (@imouniroy)

  मौनीने काही दिवसांपूर्वी सूरज आणि त्याच्या कुटुंबाबरोबर काही फोटो इन्स्टाग्राम उकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. एवढचं नाही तर सुरजच्या आई वडिलांसाठी मौनीने या फोटोत ‘मॉम आणि डॅ़ड’ असं लिहलं होतं. सूरज दुबईमध्ये बॅकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळातही मौनी तिच्या बहिणीकडे तिच्या कुटुंबासोबत दुबईमध्येच होती. या काळातले अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by mon (@imouniroy)

  एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मौनीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक मालिकांमधून झळकली. मात्र ‘देवो के देव महादेव’ या मालिकेतील तिची पार्वतीची भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच ती ब्रम्हास्त्र चित्रपटात दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by mon (@imouniroy)