jijamata

सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

ही मालिका लवकरच लीप घेणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.

nina kulkarni

अमोल कोल्हे शिवरायांच्या भूमिकेत

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका  म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते अभिनेते अमोल कोल्हे. डॉ. अमोल कोल्हे यांनी ही भूमिका अजरामर केली आहे. आता अमोल पुन्हा एकदा छत्रपतींच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत.  शिवछत्रपती मालिकेतून पहिल्यांदा डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावर शिवाजी महाराज म्हणून अवतरले. पुढे अनेक नाटकांतूनही त्यांनी ती भूमिका साकारली. शिवाजी महाराजांच्या महानाट्यातूनही ते दिसले. शिवाजी महाराज म्हणजे डॉ. कोल्हे असं समीकरण झालं. असं असतानाच संभाजी राजांवरच्या मालिकेतून ते संभाजी महाराज बनूनही आले. रसिकांना त्यांची ही व्यक्तिरेखेवरही प्रचंड आवडली. पण पुन्हा ते छत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहेत.