‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचा मुकूट खाली उतरवणाऱ्या परिक्षकाला अटक, ती घटस्फोटीत नव्हती? नवा खुलासा आला समोर!

पण पुष्पिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘मी एक घटस्फोटीत महिला नाही. त्यांना जर वाटत असेल की मी घटस्फोटीत आहे तर त्यांनी माझे घटस्फोटाचे कागद आणून दाखवावेत. मी माझ्या पती पासून वेगळी झाले आहे पण आम्ही घटस्फोट घेतलेला नाही’ असे म्हटले होते.

    ‘मिसेस श्रीलंका’ ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या स्पर्धेची विजेती पुष्पिका डी सिल्वा असल्याचे परिक्षकांनी घोषीत केले. पण नंतर काही वेळातच तिच्याकडून विजेतेपदाचं मुकूट हिसकावून घेण्यात आले. त्यानंतर पुष्पिकाने परिक्षकांविरोधात पोलिसात तक्रार केली.

    ‘मिसेस श्रीलंका’ या स्पर्धेमध्ये झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिसेस श्रीलंका २०१९चे विजेतेपद पटकावणारी कॉरोलिन परिक्षक म्हणून सहभागी झाली होती. तिने पुष्पिकाला विजेती घोषित करुन मुकूट घातला होता. पण काही वेळा नंतर ती पुन्हा मंचावर आली आणि तिने पुष्पिकाचे मुकूट हिसकावून घेतले.

    पुष्पिका ही घटस्फोटीत असल्यामुळे कॅरोलिनने तिला स्पर्धेसाठी अपात्र असल्याचे ठरवत उपविजेतीला मुकूट घातले. ‘मिसेस श्रीलंका’ ही स्पर्धा केवळ विवाहित महिलांसाठी असल्याचे कॉरोलिनने म्हटले.

    पण पुष्पिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘मी एक घटस्फोटीत महिला नाही. त्यांना जर वाटत असेल की मी घटस्फोटीत आहे तर त्यांनी माझे घटस्फोटाचे कागद आणून दाखवावेत. मी माझ्या पती पासून वेगळी झाले आहे पण आम्ही घटस्फोट घेतलेला नाही’ असे म्हटले होते.

    कोलंबो पोलिसांनी कॅरोलिनला पुष्पिकाचे मुकूट हिसकावत तिचे केस खेचल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलीस अधिकारी अजित रोहाना यांनी याबाबत माहिती देत म्हटले, ‘आम्ही परिक्षक आणि चुला मनमेंद्रला मारहाण आणि नेलम पोकुना नुकसानीच्या आरोपाखाली अटक केली आहे.’ पुष्पिकाकडून मुकूट हिसकावून घेतल्यानंतर ती तेथून बाहेर पडली. बाहेर आल्यानंतर तिने प्रासार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली जर कॅरोलिनने तिची सर्वांसमोर माफी मागितली तर ती पोलीस तक्रार मागे घेणार.