आदित्यसोबत मृणालचा ‘थाडम’!

या चित्रपटात आदित्य झळकणार असल्याचं यापूर्वीच रिव्हील करण्यात आलं होतं, पण त्याची जोडी मृणालसोबत जुळल्याचं नुकतंच रिव्हील करण्यात आलं आहे.

    मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या हिंदीत चांगलीच फॅार्ममध्ये आहे. एका मागोमाग एक महत्त्वपूर्ण सिनेमे ती आपल्या नावे करत आहे. काही दिवसांपूर्वीच राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘तूफान’मध्ये फरहान अख्तरसोबत झळकलेली मृणाल आता आदित्य रॅाय कपूरसोबत दिसणार आहे. मुदार खेतानी दक्षिणात्य ‘थाडम’चा हिंदी रिमेक बनवणार आहेत. या चित्रपटात आदित्य झळकणार असल्याचं यापूर्वीच रिव्हील करण्यात आलं होतं, पण त्याची जोडी मृणालसोबत जुळल्याचं नुकतंच रिव्हील करण्यात आलं आहे.

    या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणालनं आजवरच्या आपल्या करियरमध्ये विविधांगी भूमिका साकारत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्यांदाच ती पोलिसी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारीत असून, अद्याप टायटल फायनल झालेलं नाही. वर्धन केतकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि मुराद खेतानी करत आहेत. आॅक्टोबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे.