‘सई चोर आहे…’ असं काय घडलं की मृण्मयी देशपांडे भर सोशल मीडियावर बहिणीवर संतापली!

गौतमीच्या एका करामतीमुळे सध्या मृण्मयी चांगलीच चिडली आहे. नुकताच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय.

    मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशापांडेच्या  पावलांवर पावलं ठेवतं तिची बहिणी गौतमी देशपांडेने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. मृण्मयीप्रमाणेच गौतमीने देखील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. मृण्मयी आणि गौतमी दोघी बहिणींमध्ये त्यांच्या नात्यापलीकडची मैत्री पाहायला मिळते. अनेदा दोघी सोशल मीडियावर एकत्रित व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. असाच एक मृण्मयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    गौतमीच्या एका करामतीमुळे सध्या मृण्मयी चांगलीच चिडली आहे. नुकताच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात मृण्मयीने बहिणीचा पर्दाफाश करत तिला थेट चोर म्हंटलं आहे. मृण्मयीने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती म्हणाली, “मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडतेय. मी आज गौतमीच्या घरात असून तिचं कपाट लावतेय. मला सांगायला खूप आनंद होतोय की माझे हरवलेले सर्व कपडे मला मिळाले. त्या कपड्यांचे बोळे करून लपवण्यात आले होते. मी तिला विचारलंही होतं की माझे काही टॉप चुकून तुझ्याकडे आले आहेत का? यावर तिने नाही ताई असं सरळ उत्तर दिलं. मात्र त्या कपाटात माझे सगळे कपडे लपवून ठेवण्यात आले होते. ” असं म्हणत मृण्मयीने तिची व्यथा मांडली आहे.

     “तुम्ही ज्या सईवर प्रेम करता ती सई चोर आहे.” हा व्हिडीओ शेअर करत मृण्मयी कॅप्शनमध्ये म्हणाली, “अजूनही सुधरली नाहीये ही!!” मृण्मयीच्या या व्हिडीओवर अनेक मराठी कलाकारांनी आणि तिच्या मैत्र-मैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.