एम एस धोनीवर होते ‘या’ अभिनेत्रीचे प्रेम

सिनेकलाकरांची विविध प्रेम प्रकरण आपल्याला नेहमीच ऐकायला येत असतात. अनेकदा या प्रेम प्रकरणाचा शेवट लग्नावर होतो तर काही वेळेस यांना वेगळे वळण देखील लागते. कलाकारांबरोबरच क्रिकेटर देखील नेहमी चर्चेचा विषय ठरतात. क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते फार जुने आहे. अनेक क्रिकेटर आणि अभिनेत्रींच्या प्रेम संबंधाबाबत आजदेखील चर्चा होत असते. यातच एम एस धोनी याचे देखील नाव आहे. 

एम एस धोनी आणि  अभिनेत्री राय लक्ष्मी हे काही काळ एकमेकांना डेट करत होते. हिंदी चित्रपटांबरोबर तामिळ, तेलगू चित्रपटात राय लक्ष्मी हिने अभिनय केला आहे. एक काळ असा होता की राय लक्ष्मी भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनी ची प्रेयसी म्हणून ओळखली जात होती.  त्यानंतर धोनीच्या बायोपिक फिल्म ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ रिलीज झाली तेव्हा पहिल्यांदाच आपल्या नात्याबद्दल बोलत लक्ष्मी समोर आली. त्यांच्या नात्यावरून होणाऱ्या चर्चेला उत्तर देताना लक्ष्मी हिने आपली बाजू मांडत या नात्याला ८ वर्ष होऊन गेली आहेत. तसेच आम्ही दोघांनी एकमेकांना वचनबध्द केले नसल्याची माहिती दिली. 

 

View this post on Instagram

Sareee 😍😍😍💖💖

A post shared by Raai lakshimi fc (@lakshmi_rai_fans_page_) on