येतोय एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २!

व्‍हानात्‍मक व मनोरंजनपूर्ण टास्‍क्‍स, सेगमेंट्स व फोटोशूट्सचे सुरेख संयोजन प्रेक्षकांना व्हिज्‍युअल पर्वणी देतील.

  आपण सुपरमॉडेल्‍सचा विचार करतो तेव्‍हा आपल्‍या मनात चमकदार रॅम्‍प वॉक्‍स, डिझाइनरचे आकर्षक आऊटफिट्स, करिष्‍मा झळकवणारे मोठ्या आकाराचे होर्डिंग्‍जअद्वितीय मॅगझीन कव्‍हर्स व उत्‍साही आत्‍मविश्‍वास यांची झलक निर्माण होते. पण सर्व चमक व ग्‍लॅमरच्‍या मागे अनेक संघर्ष व रात्रभर न झोपता घेतलेली अथक मेहनत आणि स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍याचा उत्‍साह सामावलेला असतो. तसेच एमटीव्‍ही युथ स्‍टडी २०२१च्‍या मते ७५ टक्‍के लोकांचा विश्‍वास आहे की, ‘सर्वोत्तम पोशाख परिधान केलेले लोक त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या कपड्यांमध्‍ये अधिक आरामदायी असतात आणि ७८ टक्‍के लोक मान्‍य करतात की ते नेहमीच मोहक दिसत नाहीत. आकर्षक असलेल्‍या फॅशनला योग्‍य उत्‍साहासह पुनर्परिभाषित करत भारताचा पहिल्‍या क्रमांकाचा युथ एंटरटेन्‍मेंट ब्रॅण्‍ड एमटीव्ही पुन्‍हा एकदा आकर्षक नवीन थीम अनअपॉलॉजेटिकली यूसह ओले रेटिनॉल, वॅनेसा बॉडी डिओ, मॅजिक मोमेण्‍ट्स म्‍युझिक स्‍टुडिओ आणि फॅशन पार्टनर एफएनजीआर यांच्‍या सह-समर्थनाच्‍या माध्‍यमातून लिवॉन एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ चा प्रतिष्ठित व बहुप्रतिक्षित पर्व घेऊन येत आहे. २२ ऑगस्‍टपासून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता फक्‍त एमटीव्‍हीवर प्रसारित होणारा हा शो नवीन ग्‍लॅमला तुमच्‍यासाठी अधिक सुलभ करेल आणि भारताला स्‍वत:हून नीडरपणे अभिव्‍यक्‍त होणारा पुढील सुपरमॉडेल देईल. 

  वर्षानुवर्षे मॉडेलिंगच्‍या परंपरेमध्‍ये बदल झाला आहे. या परिवर्तनाने समाजाला एकमेकांपेक्षा विभिन्‍न असलेल्‍या व्‍यक्‍तींचा स्‍वीकार करण्‍याचे आवाहन केले आहे. एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ त्‍याची थीम अनअपॉलॉजेटिकली यूच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना धाडसी वृत्ती अवलंबण्‍यास आणि जीवनात कोणत्‍याही पैलूसंदर्भात टीका होत असताना देखील आपली चुणूक दाखवण्‍यास आवाहन करतो. प्रत्‍येकाने स्‍वत:च्‍या मर्जीप्रमाणे जीवन जगले पाहिजे आणि ते कोण आहे व कशासाठी ओळखले जातात हे नीडरपणे अभिव्‍यक्‍त केले पाहिजे.

  सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ ब्‍लोनी, वैशाली एस, वेरंदाह, एसे, मेलोड्रामा, पापा डोण्‍ट प्रीच, अभिषेक स्‍टुडिओ व विरशेटे इत्‍यादी सारख्‍या तरूण, उत्‍साही व नाविन्‍यपूर्ण डिझायनर्सच्‍या प्रभावी प्रदर्शनासह शोचा स्‍तर उंचावणार आहे. यंदाच्‍या सीझनमध्‍ये स्‍पर्धकांच्‍या वैविध्‍यपूर्ण समूहाद्वारे मंचाची शोभा वाढवण्‍यात येणार आहे. पोलिसांपासून राष्‍ट्रीय स्‍तरीय बॉक्‍सर, राज्‍यस्‍तरीय स्प्रिंटर, हॉकी खेळाडू ते ट्रान्‍सवुमन, प्रत्‍येक क्षेत्रातील फॅशनउत्‍साही अभूतपूर्व ग्‍लॅमर व जादू निर्माण करणार आहेत. पर्यावरणास अनुकूल फॅशन ही काळाची गरज असल्‍यामुळे शो डिझायनर अखिल नागपालसोबत नैतिक व स्थिर फॅशन रॅम्‍प वॉक विभाग देखील दिसण्‍यात येईल, जे बदलाप्रती गरजेवर भर देतील. यादरम्‍यान आव्‍हानात्‍मक व मनोरंजनपूर्ण टास्‍क्‍स, सेगमेंट्स व फोटोशूट्सचे सुरेख संयोजन प्रेक्षकांना व्हिज्‍युअल पर्वणी देतील.

  शोच्या प्रारंभावर प्रतिक्रिया देताना मलायका अरोरा म्हणाल्‍या, “आजच्या सतत विकसित होणा-या जगातजे तुम्हाला खरोखरच इतरांपासून वेगळे ठरवते ते म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व. तुम्‍ही जे कोणी आहात त्‍याबाबत नि:संदिग्‍धपणे आत्‍मविश्‍वास दाखवणे ही सर्वोत्तम गुणवत्ता आहे आणि प्रत्‍येक महत्त्वाकांक्षी सुपरमॉडेल या गुणवत्तेचा उपयोग करत शोस्‍टॉपर बनू शकतो. यंदाचा सीझन स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करत रॅम्‍पवर स्‍वत:चे गुण दाखवण्‍याबाबत आहे. आमचे आकर्षक दिवा तगडी स्‍पर्धा देण्‍यास आणि त्‍यांच्‍या अद्वितीय शैलींमध्‍ये स्क्रिनवर झळकण्‍यास सज्‍ज आहेत. 

  मिलिंद सोमणम्‍हणाले, ”वर्षानुवर्षे मी शिकलो आहे की, यशासाठी प्रामाणिकपण अत्‍यंत महत्त्वाचा आहे. तुम्‍ही जे कोणी आहात ते स्‍वीकारण्‍यासाठी धाडस व आत्‍मविश्‍वास असावा लागतो आणि आम्‍ही एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दि इअरच्‍या यंदाच्‍या सीझनमध्‍ये हीच बाब शोधणार आहोत. प्रत्‍येक सरत्‍या सीझनसह मॉडेलिंग अधिक आकर्षक व सर्वोत्तम होण्‍यासोबत आम्‍हाला काही महत्त्वाकांक्षी तरूण मॉडेल्‍स अनअपॉलॉजेटिकली उत्‍साही व चमकदार मॉडेलिंग क्षेत्रामध्‍ये त्‍यांची छाप पाडण्‍यासाठी तयारी करत असल्‍याचा आनंद होत आहे.

  अनुषा दांडेकरम्‍हणाल्‍या, ”फॅशन हा तुमच्या वैशिष्‍ट्यपूर्ण व्‍यक्तिमत्त्वाला कलात्‍मकरित्‍या अभिव्‍यक्‍त करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्‍यासाठी शब्‍दामधून प्रशंसा करण्‍याची गरज नाही. यामधून तुम्‍हाला विभिन्‍न मूड, फिल, आत्‍मविश्‍वास व कॅरेक्‍टर मिळेत. तुमची शैली व व्‍यक्तिमत्त्वाच्‍या माध्‍यमातून अभिव्‍यक्‍त करणे ही मॉडेल्‍सची सर्वात मोठी सुपरपॉवर आहे. तसेच तुमच्‍या आवाक्‍यात नसलेली शैली व आसपासच्‍या स्थितीमध्‍ये जुळून जाणे आणि ते आत्‍मसात करणे हे सर्वोत्तम कौशल्‍य आहे. तुम्‍ही जे काही कराल ते फक्‍त सर्वोत्तमच दिसेल. यंदाचा सीझन तुमचा फोकस, खुल्‍या मनाने अभिव्‍यक्‍त करणे, सीमांना मोडून काढणे आणि नीडरपणे वागणे याबाबत आहे. सुपरमॉडेलच्‍या नवीन सीझनमध्‍ये प्रेक्षक शक्तिशाली, प्रबळ, अनअपॉलॉजेटिकली प्रतिभावान सुपमॉडेल्‍स पाहायला मिळण्‍याची अपेक्षा करू शकतात, ज्‍यांना त्‍यांनी यापूर्वी कधीच पाहिलेले नाही. विविधता, प्रतिभा व सुपर गॉर्जिअस अभूतपूर्व असणार आहेत.”  

  तरूणांना अनअपॉलॉजेटिकली यू असण्‍यास प्रेरित करणारा यंदाचा सीझन स्‍पर्धकांसोबत परीक्षकांच्‍या जीवनशैलींवरील मिनी व्‍हीलॉग्‍स, बीहाइण्‍ड दि सीन्‍स, रील्‍स व नगेट्सच्‍या माध्‍यमातून उच्‍चस्‍तरीय व उच्‍च डिजिटल सहभागासह समकालीन‘ मनोरंजन देईल, ज्‍यामधून फॉर्मेटमधील अद्वितीय कथा पाहायला मिळेल. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये मॉडेलिंग क्षेत्राचे अकॅडेमिक सादरीकरण असेल. मिनी फॅशन वीक्‍समध्‍ये थीमॅटिक रॅम्प वॉक्‍सच्‍या माध्‍यमातून डिझाइनरला सादर करण्‍यात येईल. नेहमीच्‍या टीव्‍ही शोच्‍या परंपरांना मोडून काढत एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ अस्‍सल फॅशन कार्निवल असेल, जो व्‍यक्तिवाद व शैलीला प्रशंसित करेल.

  एमटीव्‍ही २२ ऑगस्‍टपासून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता ओले रेटिनॉल, वॅनेसा बॉडी डिओ, मॅजिक मोमेण्‍ट्स म्‍युझिक स्‍टुडिओ आणि फॅशन पार्टनर एफएनजीआर यांच्‍या सह-समर्थनाच्‍या माध्‍यमातून त्‍यांचा साहसी व नीडर फॅशन रिअॅलिटी शो लिवॉन एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ सह उत्‍साह वाढवत आहे. तुम्‍ही स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍यास सज्‍ज आहात का?