kangana ranaut

देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर शुक्रवारी अभिनेत्री कंगना रणावत आणि बहिण रंगोली चेंदेली यांचा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यात आला.  जवळपास २ तास कंगना व रंगोलीची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर कंगनाने एक ट्विट करत तिचा राग व्यक्त केला.

देशद्रोहाचा आरोप प्रकरणात अभिने६ कंगना रणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाकडून २५ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. अटकेसारखी कठोर कारवाई करू नये असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. त्याचप्रमाणे २५ जानेवारीच्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कंगनाला चौकशीसाठी बोलावू नये, असेही निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांकडून तिला चैकशीसाठी शुक्रवारी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याअनुषंगाने कंगनाने पोलिस ठाण्यात हजेरी लावली. एका प्रकरणात धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेट्रोलियन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार अभिनेत्री कंगना विरुद्ध भा.दं.सं. कलम २९५-ए आणि १५३-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर असलेले मूनवर अली सय्यद यांच्या न्यायालयात अर्ज करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र कंगना वैयक्तिक कारणास्तव चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली.

 

देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर शुक्रवारी अभिनेत्री कंगना रणावत आणि बहिण रंगोली चेंदेली यांचा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यात आला.  जवळपास २ तास कंगना व रंगोलीची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर कंगनाने एक ट्विट करत तिचा राग व्यक्त केला. “जर तुम्ही देशाविरोधात असाल तर तुम्हाला खूप पाठिंबा, काम करण्याची संधी, पुरस्कार आणि कौतूक मिळेल. पण जर तुम्ही राष्ट्रवादी असाल तर तुम्हाला एकट्यालाच उभं रहावं लागेल. स्वत:च स्वत:च्या मदतीचा स्त्रोत व्हा”, असं ट्विट कंगनाने केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी जाण्यापूर्वी कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्येदेखील तिने तिचा राग व्यक्त केला होता. “माझं मानसिक, भावनिक व आता शारीरिक शोषण का केलं जात आहे? मला देशाकडून याचं उत्तर हवंय. मी तुमच्यासाठी उभं राहिले होते. आता तुम्ही माझ्यासाठी उभं रहा”, असं म्हणत कंगनाने व्हिडीओ शेअर केला होता.