bollywood memes

मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) कोरोनाविषयक जनजागृतीसाठी अनोखी युक्ती शोधून काढली आहे.#BeBollyGood नावाने त्यांनी एक मोहिम(Mission by Mumbai Police) सुरु केली आहे.

  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सगळा देश कोरोनामुळे चिंतेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. तरीसुद्धा लोक कोरोनाविषयक नियम पाळताना दिसत नाहीत. अशातच मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) कोरोनाविषयक जनजागृतीसाठी अनोखी युक्ती शोधून काढली आहे.#BeBollyGood नावाने त्यांनी एक मोहिम(Mission by Mumbai Police) सुरु केली आहे.

  अभिनेत्यांच्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी लोकांना कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेले हे नवे मीम्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

  राजेश खन्ना यांच्या नावावर केलेला प्रयोग अनेकांना आवडला आहे. लोकांनी यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी ‘अनुपम तुम घर से निकले तो तुम्हारी खैर नही है’ असेही एक वाक्य तयार केले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

  आयुष्मान खुरानाच्या नावावरून तयार करण्यात आलेले मीम बघितल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. आयुष्मानला स्वत:ला हे मीम खूप आवडले आहे. त्याने ‘शहर के सारे विक्की डोनर प्लीज मुंबई पुलिस की बात सुनिए और बाहर जाने की बेवकुफिंया न करो, आपको काफी समय मिळेगा अपनी प्यारी बिंदू से बात करने केलिए I अभी टाईम नही है की हम नौटंकी साला बने और रिस्क ले.फिलहाल शुभमंगल और ज्यादा सावधान I अशी कमेंट केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

  अमिताभ बच्चन आणि कल्की कोचलीनचेही मीम तयार करण्यात आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)