मुंबई : कलिना कॅम्पसमध्ये ‘सुर­-ताला’चा निनाद घुमणार; दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयास मंजुरी

दोन दिवस चाललेली सिनेट सर्वसाधारण सभा शुक्रवारी रात्री १२.३० वाजता संपली. सिनेट सदस्यांच्या आंदोलनामुळे आधी नाकारलेला प्रस्ताव कुलगुरुंना मान्य करावा लागला आणि अखेर मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयास( Dinanath Mangeshkar Government Music College) मंजुरी मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या महाविद्यालयाचा प्रस्ताव नाकारला होता. परंतु, सिनेटच्या दुसऱ्या दिवशी स्थगन प्रस्तावादरम्यान युवासेनेच्या सदस्यांनी आक्रमक प्रवित्रा घेतल्यामुळे कुलगुरुंनी संगीत महाविद्यालयास परवानगी दिली. यानुसार विद्यापीठाने शासकीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथे करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राजभवन आणि शासनास पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : दोन दिवस चाललेली सिनेट सर्वसाधारण सभा शुक्रवारी रात्री १२.३० वाजता संपली. सिनेट सदस्यांच्या आंदोलनामुळे आधी नाकारलेला प्रस्ताव कुलगुरुंना मान्य करावा लागला आणि अखेर मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयास( Dinanath Mangeshkar Government Music College) मंजुरी मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या महाविद्यालयाचा प्रस्ताव नाकारला होता. परंतु, सिनेटच्या दुसऱ्या दिवशी स्थगन प्रस्तावादरम्यान युवासेनेच्या सदस्यांनी आक्रमक प्रवित्रा घेतल्यामुळे कुलगुरुंनी संगीत महाविद्यालयास परवानगी दिली. यानुसार विद्यापीठाने शासकीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथे करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राजभवन आणि शासनास पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

    राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वादाचे पडसाद मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत पाहावयास मिळाले. स्थगन प्रस्ताव सुरू झाल्यावर युवासेनेचे सदस्यांसी आक्रमक पवित्रा घेतला. मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयात संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी असून ते या महाविद्यालयात ज्ञानदान करणार आहेत.

    या महाविद्यालयासाठी शासनाने विद्यापीठाकडे पाच एकर जागेची मागणी केली. मात्र राजभवनातून विद्यापीठाच्या विकास आराखडा तयार होईपर्यंत विविध संस्थांकडून जागांसाठी आलेल्या प्रस्तावावर विचार करू नये असे निर्देश दिल्याने हा प्रस्ताव नाकारला होता. यावरून प्रदीप सावंत यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेला आल्यानंतर अन्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कुलगुरूंना धारेवर धरले. त्याच ठिकाणी हातात फलक घेऊन निषेध केला. या आक्रमक भूमिकेमुळे विद्यापीठाने मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथे करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राजभवन आणि शासनास पाठविण्याचा निर्णय घेतला.

    राज्यपाल नियुक्त सदस्य सुधाकर तांबोळी आणि धनेश सावंत यांनी विद्यापीठाच्या संगीत विभागाचे स्वरूप वाढवून त्याला महाविद्यालयाचे नाव देण्याची सूचना केली. विद्यापीठाची जागा सरकारची आहे. ती विद्यापीठाकडे मागण्याची गरज नाही. यापूर्वी विद्यापीठाने विविध संस्थांना जागा देताना सरकारकडे विचारणा केली होती का? असा प्रश्न सरकारच्या वतीने उपस्थित असलेले उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी उपस्थित केला. त्यांनी सोमवारी कुलगुरू आणि मंत्र्यांची बैठक आयोजित करू, असे निवेदन दिले.

    विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सभागृहात दखल घेतली जात नसेल तर रस्त्यावर उतरू, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, तुमच्या निलंबनाच्या कारवाईला घाबरत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी १० वेळा निलंबन झाले तरी चालेल, अशी आक्रमक भूमिका अॅड. वैभव थोरात यांनी सभागृहात मांडली. तसेच विद्यापीठातील हंगामी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात यावे, ही आग्रही मागणी करून विद्यार्थ्यांचा अनेक न्याय प्रश्नांवर आवाज उठवून तसेच विद्यापीठाच्या विविध समस्यांवर उपायात्मक चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.