taxi no . 24

जगजीत संधू आणि अनंगषा बिस्वास हे दोघे मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमामध्ये समीर हा तरुण दिवसभराच्या दगदगीनंतर लाल बहादूर या टॅक्सीचालकाच्या टॅक्सीत बसतो. एक सायकोकिलर शहरात मोकाट फिरत असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमित्र सिंग याने केले असून साविराज शेट्टी यांनी निर्मिती केली आहे. जयंत यांनी या सिनेमाला उत्तम संगीत दिले असून त्यांनी यात एक गाणे लिहिलेदेखील आहे.

महेश मांजरेकर यांच्या आगामी टॅक्सी नंबर २४ चित्रपटासाठी काम करताना संगीत दिग्दर्शक जयंत सांकला यांना आनंद होत आहे. आपला आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, इतके तगडे कलाकार असलेल्या अद्वितीय सिनेमासाठी काम करण्याचा अनुभवसुद्धा अद्वितीय होता. मी महेश सरांना पहिल्यांदा कांटे या चित्रपटात पाहिले आणि तेव्हापासून मी त्यांच्या प्रेमातच पडलो. त्यामुळे, त्यांच्या सिनेमासाठी संगीत देण्याबद्दल मला दिग्दर्शक सौमित्र यांनी विचारल्यावर मी लगेचच होकार दिला.

taxi no . 24

जगजीत संधू आणि अनंगषा बिस्वास हे दोघे मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमामध्ये समीर हा तरुण दिवसभराच्या दगदगीनंतर लाल बहादूर या टॅक्सीचालकाच्या टॅक्सीत बसतो. एक सायकोकिलर शहरात मोकाट फिरत असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमित्र सिंग याने केले असून साविराज शेट्टी यांनी निर्मिती केली आहे. जयंत यांनी या सिनेमाला उत्तम संगीत दिले असून त्यांनी यात एक गाणे लिहिलेदेखील आहे.

jayant sankala

मी पार्श्वसंगीताला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा असल्यामुळे यात आवाजाचे चढ-उतारदेखील त्याला साजेसेच ठेवले आहेत. सिनेमाच्या थीम ट्रॅकमुळे आपल्याला ८० च्या दशकातला रॉक अण्ड रोल फील येईल. मी यात जन्नत दिखा दू हा च्रॅक जॅझ प्रकारात तयार केला असून या गाण्यावर रसिक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी आतूर झालो आहे.

जयंत सांकला आणि दिग्दर्शक सौमित्र सिंग यांचा एकत्र असा टॅक्सी नंबर २४ हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी सौमित्र सिंग यांच्यासोबत जयंत सांकला यांनी नसिरुद्दिन शहा आणि नवनी परिहार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या द वॉलेट या लघुपटासाठी काम केले होते.