संगीत मार्तंड पंडित जसराज जी एक अविश्वसनीय कलाकार : अमित शाह

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं आज निधन आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील न्यूज जर्सी येथे त्यांचं निधन झालं.

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं आज निधन आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील न्यूज जर्सी येथे त्यांचं निधन झालं. पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते.  स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे आणि ‘जसरंगी जुगलबंदी’ या आगळ्या वेगळ्या गायन प्राकाराचे संगीतसृष्टीला योगदान देणारे मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख  होती.  

त्यांच्या या निधनावर भाजप नेते अमित शाह यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले की, संगीत मार्तंड पंडित जसराज जी एक अविश्वसनीय कलाकार होते ज्याने भारतीय शास्त्रीय संगीताला आपल्या जादुई आवाजाने समृद्ध केले. त्यांच्या निधनामुळे वैयक्तिक नुकसान झाल्यासारखे वाटते. तो आपल्या निर्भय कृत्यांद्वारे आपल्या अंत: करणात कायम राहील. त्याच्या कुटुंबीयांना आणि अनुयायांना सहानुभूती असे ट्विट त्यांनी केले.