संगीतकार चिनार महेश लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार हे आपल्या घरूनच आपल्या कलेचे सादरीकरण करत होते. सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्हिडिओ अॅपमुळे अनेक कलाकार स्वतःहून प्रेक्षकांपर्यंत पोहचत होते.  प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांना अप्रत्यक्ष का होईना पण मनोरंजन करताना पाहून फार आनंद होत होता. आता  संगीतकार आणि गायक सुद्धा ऑनलाईन आपली कला सादर करू लागले आहेत.

होऊ दे व्हायरल एंटरटेनमेंटतर्फे नुकताच रोहन रोहन यांच्या ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्टचा सोहळा पार पडला. हा रोहन रोहनच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताच्या जोडीला स्पृहा जोशी हीचे सूत्रसंचालनसुद्धा होत. संपूर्ण जगभरात गाजलेल्या या ऑनलाईन कॉन्सर्टनंतर आता पुन्हा एकदा होऊ दे व्हायरलचे निर्माते कुणाल हेरकळ चिनार महेश यांचे ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्ट घेऊन आले आहेत. या सोहळ्यात अनेक मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत. या लाईव्ह इन कॉन्सर्टची संपूर्ण माहिती लवकरच सोशल मीडियामार्फत देण्यात येणार असून हे कॉन्सर्ट सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच करण्यात येणार आहे. 

या कॉन्सर्टविषयी संगीतकार चिनार महेश म्हणाले की, सध्या अनेक गोष्टी ऑनलाईन होत आहेत. मग गायक  कलाकारांनी का मागे राहावं म्हणून आम्ही ऑनलाईन लाईव्ह कॉन्सर्ट करण्याचं मनावर घेतलं. आम्ही संगीतकार आमच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये राहून गाणी संपूर्ण जगाला सुरांचा मैफिलीत न्हाहून टाकणार आहोत. पुन्हा एकदा नव्याने रसिक मायबापाच्या सेवेत आम्ही कार्यरत होत आहोत.