सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं पुण्यात निधन

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे (musician Narendra Bhide passes away) यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे (Narendra Bhide) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ४७ वर्षांचे होते. काल गुरुवारी १० डिसेंबर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र भिडे (musician Narendra Bhide passes away) यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

सिव्हिल इंजिनीयरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नरेंद्र भिडेंना मिळालेले पुरस्कार

झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही. शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नरेंद्र भिडे यांची सांगीतिक कारकीर्द

सरसेनापती हंबीरराव (आगामी), मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, तसेच नाटकांमध्ये कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, अशा प्रकारची अनेक नाटके लोकप्रिय ठरली आहेत. तसेच अवांतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, सुर-ताल, कॉमेडी डॉट कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम अशा प्रकारच्या मालिका सुद्धा सुप्रसिद्ध ठरल्या आहेत.