musician vijay patil

ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील(Vijay Patil) यांचं नागपूरमध्ये(Nagpur) निधन झालं आहे.

    जेष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण(Ram lakshman) यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षांच होते. नागपूरमध्ये(Nagpur)  आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण त्यांची तब्येत खालावली होती. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

    वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील या जोडगोळीने राम लक्ष्मण नावाने अनेक चित्रपटांना संगीत दिले.

    ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे सिनेमे आणि त्यातील  गाणी. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण यशस्वी ठरले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.