pearl puri

काल रात्री उशिरा पर्ल पुरी याला पोलिसांनी अटक केली होती .पर्ल पुरीसह ६ जणांवर बलात्काराचा गुन्हा(Rape Case) दाखल करण्यात आल्याचे समजते.

  ‘नागिन’ फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरी (Pearl V Puri Got bail) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा पर्ल पुरी याला पोलिसांनी अटक केली होती .पर्ल पुरीसह ६ जणांवर बलात्काराचा गुन्हा(Rape Case) दाखल करण्यात आल्याचे समजते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pearl V Puri (@pearlvpuri)

  पर्लची खास मैत्रीण-अभिनेत्री करिश्ना तन्ना हिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसमवेत  माहिती शेअर करताना लिहिले की, “सत्यमेव जयते. सत्य नेहमीच जिंकतो आणि पर्ल जिंकला आहे.’ या पोस्टमध्ये, करिश्माने #IStandWithPearlPuri, #TruthNeverHides, #PVP सारख्या हॅशटॅगचा वापर केला आहे.

  अभिनेता पर्ल पुरी याला या संपूर्ण प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचा जामीन नाकारण्यात आला आहे. अद्यापपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे सुटलेले नाही. ‘नागीन ३’, ‘बेपनाह प्यार’ अशा मालिकांमध्ये काम केलेल्या पर्लवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे आणि त्याच प्रकरणात अभिनेत्याला अटक करण्यात आली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna)

  या महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर ४ जून रोजी रात्री उशीरा पर्लला अटक करण्यात आली. पर्ल सध्या पोलिसांच्या ताब्यात होता. आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी पर्लला पोलिसांनी अटक केली होती. अहवालानुसार या मुलीचे वय ५ ते ७ वर्षाच्या दरम्यान आहे आणि म्हणून पर्लवर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या अनेक तक्रारींमध्ये असे लिहिले गेले आहे की, मुलीला पर्लबरोबर सेल्फी घ्यायची होती. त्यानंतर पर्ल तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेला.  तिथे त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण २ वर्षांपुर्वीचं आहे.