बापरे, नागराज मंजुळे आणि बिग बींच्या ‘झुंड’ ओटीटी हक्क ‘इतक्या’ कोटींना विकले गेले!

‘झुंड’ मधून फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची गोष्ट बघायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यात फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

    मराठीतील सगळ्यात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘सैराट’. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. या चित्रपटामुळे आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू, आकाश ठोसर प्रकाश झोतात आलेच पण या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजूळे ही फेमस झाले. ‘झुंड’च्या निमित्ताने नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

    ‘झुंड’ मधून फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची गोष्ट बघायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यात फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैराट फेम रिंकू राजगुरूही झळकणार आहे. या चित्रपटाच्या सगळेच प्रतिक्षेत आहे. पण हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसल्याचं समजत आहे. हा बहुचर्चित चित्रपटाने देखील ओटीटीचा मार्ग निवडला आहे. ३३ कोटींना या चित्रपटाचे राईट्स विकले गेले आहेत.

    झुंडची प्रतिक्षा

    अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, नागराज मंजुळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात असल्यामुळे चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. कोरोनाच्या आधी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. काही सेकंदाच्या या टीझरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचं संगीत अजय- अतुल यांनी केलं आहे.