राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एस.पी,जननथन यांच निधन, चित्रपटाचं शुटींग थांबलं, ‘ही’ अभिनेत्री दिसणार होती मुख्य भुमिकेत!

एसपी जननथन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक होते. या प्रतिभावान दिग्दर्शकानं आपल्या चित्रपटांतून अनेक नवख्या कलाकारांना संधी दिली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला प्रत्येक चित्रपट एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा ठरला आहे.

    तमिळ चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.पी,जननथन यांचे काल रविवारी १४ मार्चला निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीला धक्का बसला. ते सध्या त्यांच्या आगामी लाबम या चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटात अभिनेत्री श्रृती हसन आणि अभिनेता विजय सेतूपती मुख्य भूमिकेत होते. पण एस.पी,जननथन यांच्या जाण्याने चित्रपटाचं शुटींग थांबलं आहे.

    एसपी जननथन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक होते. या प्रतिभावान दिग्दर्शकानं आपल्या चित्रपटांतून अनेक नवख्या कलाकारांना संधी दिली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला प्रत्येक चित्रपट एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा ठरला आहे.

    एस पी जननथन यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात २००३ च्या ‘Iyarkai’ या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटात अरुण विजय, शम आणि कुट्टी राधिका मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटासाठी जननथन यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी ‘पुरमपक्कु अंगिरा पोडूवुदाईमई’ हा चित्रपट तयार केला. या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच विजय सेतुपतीला संधी दिली होती.