‘मिस्टर इंडिया’ फिल्मचे एडिटर वामन भोसले यांचे निधन!

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले, “मास्टर फिल्म एडिटर वामन भोसले यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला बहुमान मिळाला.

    बॉलिवूड राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन झाले. वामन भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या चार दशकांमध्ये ‘मौसम’, ‘हिरो’, ‘कर्झ’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘अग्निपथ’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी काम केले आहे. वामन अनेक आजारांनी त्रस्त होते. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले, “मास्टर फिल्म एडिटर वामन भोसले यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला बहुमान मिळाला. ‘आंधी’, ‘कर्ज’, ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘गुलाम’ यासारख्या चित्रपटांसाठी ते नेहमीच आठवणीत राहतील.”

    वामन भोसले यांनी १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९७७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इनकार’ या चित्रपटासाठी वामन यांना सर्वोत्कृष्ट एडिटरचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.