रश्मिका मंदानाने केली #SpreadingHope उपक्रमाची सुरूवात, नेमका काय आहे?

रश्मिका आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून अशा लोकांच्या कहाण्या सांगणार आहे जे आपापल्या पद्धतीने समाजाची मदत करत आहेत. या आधी देखील, रश्मिकाने आपल्या फॉलोअर्ससाठी अनेक पॉजिटिव्ह मॅसेज आणि फोटोज शेअर करत आली आहे.

    नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने नुकतीच आपल्या सोशल मीडियाद्वारे एका उपक्रमाची ‘#SpreadingHope’ ची सुरुवात केली असून या माध्यमातून ती अशा सामान्य माणसांच्या कहाण्या जगासमोर आणणार आहे ज्यांनी या कठीण काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. रश्मिकाने या उपक्रमाविषयी सांगण्यासाठी आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यामध्ये ती या कॅम्पेनच्या उद्देश्याविषयी म्हणते- या कठिण काळात आशा आणि हसू पसरवूयात!

    “येत्या काही आठवड्यांमध्ये, मी असामान्य कार्य करणाऱ्या काही सामान्य माणसांना या माध्यमातून आपल्या समोर आणू इच्छिते, ज्यांनी मला आशा दिली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. ज्याने मला जाणीव झाली की जेव्हा आपण अशा कोणत्यातरी स्थितीशी लढत असतो, तेव्हा याने काहीच फरक नाही पडत की आपली भाषा कोणती आहे किंवा आपण कुठे राहतो.” रश्मिका आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून अशा लोकांच्या कहाण्या सांगणार आहे जे आपापल्या पद्धतीने समाजाची मदत करत आहेत. या आधी देखील, रश्मिकाने आपल्या फॉलोअर्ससाठी अनेक पॉजिटिव्ह मॅसेज आणि फोटोज शेअर करत आली आहे.

    सध्या सुरु असलेल्या तिच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर रश्मिकाकडे सध्या 2 बॉलीवुड चित्रपट आहेत, ज्यातील एक ‘मिशन मजनू’ आणि दुसरा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘गुडबाय’ हे चित्रपट आहेत.