‘आनंदी गोपाळ’ २ राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित, या विभागात उमटवली मोहोर!

या सिनेमात आनंदीबाईंच्या भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद आणि गोपाळराव यांच्या भूमिकेतील ललित प्रभाकर यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या आहेत.

  ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली. अनेक पुरस्कार मिळवलेला समीर विध्वंस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाची देखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वर्णी लागली. सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांच्या श्रेणीत ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी देखील या सिनेमाला मिळाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans)

  भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांचा हा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.

  या सिनेमात आनंदीबाईंच्या भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद आणि गोपाळराव यांच्या भूमिकेतील ललित प्रभाकर यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या आहेत.