natkhat

यंदा अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ (natkhat)या लघुपटाला(short film) ऑस्कर पुरस्कारासाठी(oscar award) नामांकन मिळाले आहे.

भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ (natkhat)या लघुपटाला(short film) ऑस्कर पुरस्कारासाठी(oscar award) नामांकन मिळाले आहे. २०२१ च्या ऑस्करसाठी ‘नटखट’ची निवड करण्यात आली आहे. RSVP या संदर्भात ट्विट केले आहे. ‘नटखट’ या शॉर्टफिल्मला ऑस्कर २०२१ मध्ये शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे.

दरम्यान विद्या बालनने यावर आनंद व्यक्त केला आहे.  हा चित्रपट माझ्यासाठी खास असल्याचे तिने म्हटले आहे.

नटखट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा ३३ मिनिटांचा लघुपट आहे. पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि इत्यादी विषय या लघुपटात मांडण्यात आले आहेत.

आजवर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नटखटचं स्क्रिनिंग करण्यात आलं. तसंच वी आर वन: अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (२ जून २०२०) मध्ये या लघुपटाचं वर्ल्ड प्रिमिअर करण्यात आलं.