त्या वादग्रस्त विधानावर अमिताभ बच्चनची नात मुख्यमंत्र्यांवर भडकली, फोटो शेअर करत म्हणाली ‘मी अशीच वागणार, आधी मानसीकता बदला!’

मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असंही ते म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल.

  उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं. रिप्ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्यानं प्रतिक्रिया दिली आहे. नव्या नंदानं आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

   काय म्हणाली नव्या

  नव्यानं सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्‍क्रीनशॉट शेअर केलाय. WTF, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. मी अभिमानानं रिप्ड जीन्स घालणार आहे. मुख्यमंत्री आम्हाला चांगलं वातावरण देऊ शकतात का? मी माझी रिप्‍ड जीन्स घालणार, धन्यवाद.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

   

  काय म्हणाले उत्तराखंडचे मुख्यमंत्री

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात रावत यांनी आक्षेप घेतला आहे. आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

  मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असंही ते म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)