हत्येचा कट रचल्याप्रकरणी NCB ने सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या मित्राला केली अटक!

एनसीबीने सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची  कारवाई केली आहे.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला पुढील महिन्यात १ वर्ष पुर्ण होईल. सुशांतच्या निधनानंतर सगळ्या चाहत्यांना धक्का बसला होता. गेल्यावर्षी या घटनेने संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

    एनसीबीने सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची  कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे.

    सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादहून अटक केली आणि त्याला मुंबईला ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले आहे. त्याच्या रिमांडसाठी आज त्याला मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम 27, 28 आणि 29 अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत.