sushant singh rajputs vescera report

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणासंदर्भात NCB कडून मोठी कारवाई करण्यात आलीये. या प्रकरणातील एनसीबीनं मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केलीये यात ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

एनसीबीने झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीये. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार असल्याची माहिती एएनआयनी दिली आहे. तर महाकाल हा ड्रग्ज पुऱवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करायचा. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत होता. बुधवारी NCB कडून करण्यात आलेली कारवाई ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे सकाळी कारवाई करण्यात आली. यादरम्यान, महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.